महाराष्ट्र बातम्या

राज्यातील निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य खालावले; 'मार्ड'चे थेट राज्यपालांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: रुग्णांवर उपचार करणारे निवासी डॉक्टर सध्या मानसिक तणावातून जात आहेत. अतिरिक्त काम, वरिष्ठ डॉक्टरांकडून अपमान, सीट सोडल्याचा २० लाख रुपये दंड आदी कारणांमुळे डॉक्टरांमधील ताण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यातील निवासी डॉक्टरांनी राज्यपालांना पत्र लिहून या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

सुमारे सहा हजार निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ने (मार्ड) सरकारला पत्र लिहून त्यांच्या समस्यांची माहिती दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून निवासी डॉक्टरांचा जाहीर अपमान केला जातो, हे एक प्रकारचे मानसिक शोषण आहे.

निवासी डॉक्टर हा अपमान सहन करतात, कारण त्यांचे गुण प्राध्यापकांच्या हाती असतात. निवासी डॉक्टरांमध्ये तणावाचे आणखी एक कारण म्हणजे अधिक काम. हे डॉक्टर दर आठवड्याला १०० ते १२० तास काम करतात. अनेकदा ३६ तास सतत काम करावे लागते. कामाचा ताण आणि अपमान आणखी ताणतणाव वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या या धक्कादायक आकडेवारीनंतर सरकारला जाग येणार का? हाच प्रश्न आहे. सध्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतरांवर ताण येतो. त्यामुळे आरोग्य विभागात भरती करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT