Meteorite or satellite pieces Meteorite or satellite pieces
महाराष्ट्र बातम्या

उल्कापात की उपग्रहाचे तुकडे? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने (Meteorite or satellite pieces) सर्वत्र कुतुहलमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे. विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती. मात्र, लाडबोरी येथे धातूच्या पत्र्याचे मोठे तुकडे आढळून आल्यामुळे हा प्रकार उल्कापाताचा नसल्याचेही बोलले जात आहे. (Meteorite or satellite pieces)

चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री साडे सात ते आठच्या सुमारास अवकाशात प्रवाही लाल प्रकाश दिसल्याने नेमका प्रकार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर सर्वत्र या प्रकाराचीच चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आपापल्या भागातील व्हीडीओ, फोटो समाजमाध्यमावर शेअरही केले. हा लाल प्रकाश पश्चिम दिशेला आकाशात दिसला. एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने जळत येत असल्याचे हे चित्र होते.

याबाबत चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, एखादा जुना व निकामी झालेला उपग्रह पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे खेचले जाऊन वातावरणात घर्षणामुळे त्याचे तुकडे झाले असावे. उल्कापाताची शक्यता त्यांनी नाकारली. निकामी झालेल्या उपग्रहांचा असा भरपूर कचरा अवकाशात आहे. असाच प्रकार नागपुरात २००० सालच्या एप्रिल महिन्यातही घडला होता.

लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून (Meteorite or satellite pieces) आले असून यातील एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे. हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत. याठिकाणी रात्री पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अवकाशातून शेतात काही तरी पडल्याचे दिसल्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांची मोठा गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT