MHADA Team Sakal
महाराष्ट्र बातम्या

'८०० रुपये खर्च करून पुण्यात आलो, साहेब आता काय करू?'

म्हाडाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये संताप निर्माण झालाय.

सुधीर काकडे

म्हाडाकडून (MHADA) आज गृहनिर्माण विभागातील वेगवेळ्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रात्री दोन वाजता एक व्हिडिओ शेअर करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात (MHADA Exam Postponed) आल्या असल्याचं सांगितलं. आधी आरोग्य भरतीमध्ये आणि आता म्हाडाच्या भरतीमध्ये झालेल्या या गोंधळामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. वर्ष वर्ष परीक्षांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

आज म्हाडाच्या विविध पदांसाठी परीक्षा होणार होती. पण, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्ये त्यांनी माफी मागत, काही तांत्रिक अडचणीमुळे आजच्या म्हाडाच्या परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा जानेवारी महिन्यात घेणार आहेत. उमेदवारांनी सकाळी घराच्या बाहेर पडू नये, परीक्षा केंद्रावर जाऊ नये, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर येण्याची सुचना हॉलतिकीटवर केली असल्यानं अनेक उमेदवार परीक्षा केंद्र असलेल्या शहरात पोहोचले होते. लातूरच्या अजय कुंभार नावाच्या एका उमेदवारानं आपली व्यथा मांडताना 'परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपन्यांच्या अशा भोंगळ कारभारामुळे आमचं मानसिक खच्चीकरण होतंय' असं सांगितलं. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या या उमेदवाराच्या भावना त्याच्याच शब्दात...

"कोरोनामुळे दोन वर्षांपासून परीक्षा झाल्या नाही, त्यात हे असं होतंय. मी महिनाभरापूर्वी असिस्टंट इंजिनीअर पदासाठी २५० खर्च करून फॉर्म भरला होता. मला कात्रजचं सेंटर मिळालं होतं. ३५० किमीवरून मी पुण्यात आलो. येण्यासाठी महामंडळाच्या बस नाही, तर ८०० रुपये खर्च करून ट्रॅव्हल्सने यावं लागलं. परीक्षेला फ्रेश माईंडनं जाता यावं म्हणून रात्री लवकर झोपलो. रात्री दोन वाजता अचानक मित्राचा फोन आला धक्का बसला. परीक्षांच्या या अशा गोंधळामुळं आमची मानसिकता खराब होतेय, माननिय मुख्यमंत्री आम्ही अशा परीस्थितीत काय करायचं? आमच्या पालकांनाही भरपुर अपेक्षा होत्या." अशा भावना अजयने व्यक्त केल्या. अजय सारख्या लाखो मुलांच्या देखील अशाच भावना आहेत.

दरम्यान, यापूर्वीसुद्धा आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये घोळ झाला होता. परीक्षांमध्ये होणाऱ्या गोंधळाचा फटका उमेदवारांना बसत असून, त्यामुळे अनेकांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. मागच्या काळात ढीम्म कारभारामुळे स्वप्निल लोणकर या राज्य सेवेची परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने आत्महत्या केली होती. मात्र तरी देखील परीक्षांचे हे घोळ सुरूच आहे. विद्यार्थ्यांचं होणारं मानसिक आणि आर्थिक नुकसान, तसेच भवितव्याबद्दलचा निर्माण होणारा प्रश्न याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT