महाराष्ट्र बातम्या

रोहीत पवार म्हणाले, "परीक्षा पुढे ढकलली जाणं दुर्दैवी पण,..."

MHADA EXAM : म्हाडाच्या परीक्षांमध्येही गोंधळ; उमेदवारांमध्ये संताप

सुधीर काकडे

म्हाडाकडून (MHADA) आज गृहनिर्माण विभागातील वेगवेळ्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रात्री दोन वाजता एक व्हिडिओ शेअर करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या (MHADA Exam) असल्याचं सांगितलं. त्यावर आता विद्यार्थ्यांनी परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी सकाळी उठताच त्यांना परीक्षा पुढे ढकलली गेल्याचं कळत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. परंतु परीक्षा पुढे ढकलण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे असं म्हणत आमदार रोहीक पवार यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहीत पवार यांनी या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका विद्यार्थ्यांच्या हीताची असल्याचं सांगितलं आहे. "मोठ्या मेहनतीने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून चुकीच्या गोष्टींची कुणकुण लागताच आव्हाड साहेबांनी स्पष्ट भूमिका घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी आज अडचणीचा वाटत असला तरी त्यात विद्यार्थ्यांचंच हित आहे." असंही रोहीत पवार यांनी यावेळी सांगितलं.

रोहीत पवार काय म्हणाले?

"एवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची लूट करणारे व्यवस्थेतील दलाल शोधून संपूर्ण व्यवस्थाच स्वच्छ करावी लागणार आहे. सर्वच परीक्षा #MPSC अंतर्गत आणणं हाच यावर उपाय असू शकतो. हे तातडीने करणं तांत्रिकदृष्टया शक्य नसलं तरी टप्प्याटप्प्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासन याबाबतीत नक्कीच सकारात्मक काम करत असलं तरी यासंदर्भात अपेक्षित वेगाने मात्र काम होताना दिसत नसल्याची खंत प्रत्येक युवकासह माझ्या मनातही आहे. लवकरात लवकर सर्व परीक्षा #MPSC अंतर्गत आणण्यासाठी एक निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम आखावा, ही विनंती."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT