Mhada  Sakal
महाराष्ट्र बातम्या

अखेर म्हाडा भरती परीक्षा होणार ऑनलाइन

1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार म्हाडा भरती परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फोडण्याचा कट उघड झाल्याने म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. यानंतर विविध परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीची या परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून या कंपनीमार्फत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर येताच म्हाडाने 12 ते 20 डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केली. या वादावर पडदा टाकण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी भरती परीक्षा म्हाडा स्वतः घेईल असे जाहीर केले. मात्र म्हाडा प्रशासनामार्फत पावणे तीन लाख उमेदवारांची परीक्षा घेणे अशक्य असल्याने अखेर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार होती. यामुळे म्हाडाच्या निर्णयावर उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. उमेदवारांची मते लक्षात घेऊन म्हाडाने अखेर 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक व अन्य सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असे म्हाडाने अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pollution Health Impact : जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली नाही, तर भारतातील दुसरेच शहर, याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतोय?

राजस्थान रॉयल्सकडून खेळला, 22 व्या वर्षी क्रिकेटला रामराम; आता RCBचा मालक, कोण आहे आर्यमन?

Latest Marathi News Live Update : पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्येत खरातचा सहभाग असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Satara Fuel Demand : पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा; गॅसनंतर आता पेट्रोलसाठी नागरिकांची मोठी गर्दी

पहिल्यांदा सासूबाईला पाहिल्यावर पूजा बिरारीला फुटलेला घाम, सुचित्रा बांदेकरबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली...'त्या मला बोलत होत्या आणि...'

SCROLL FOR NEXT