Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

MHADA Lottery: म्हाडाच्या घरांच्या सोडतीच प्रमाण बदलणार; माफक किंमतींबाबतही फडणवीसांचे संकेत

म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी आज जाहीर झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी आज जाहीर झाली. यावेळी सोडतीच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. यामध्ये लॉटरीच्या सोडतीचं प्रमाण बदलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

तसेच घरांच्या किंमती कशा कमी राहतील याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (MHADA Mumbai Lottery Devendra Fadnavis Proportion of lottery price of houses)

तरच गरिबांना घरं देण्याचा प्रश्न मार्गी

फडणवीस म्हणाले, "म्हाडाची आज आपण लॉटरी काढतोय सावेंनी सांगितल्याप्रमाणं पारदर्शकता असण्यासाठी मागच्यावेळी आपण लॉटरी ऑनलाईन सुरू केली. ज्याचं भाग्य असेल अशा भाग्यवंताना ही लॉटरी निघेल. मात्र, ज्यांना मिळणार नाही त्यांच्यासाठीही म्हाडाला प्रयत्न करावा लागेल. म्हाडानं प्रिमियमच्या मागे लागू नये, हाऊसिंग स्टॉक घेतला तरच गरिबांना घरं देण्याचा प्रश्न मार्गी लागेल"

सोडतीचं प्रमाणं बदलणार

बीडीडीचा प्रश्न मार्गी लागतोय, म्हाडाच्या कॉलनीतही आपण पारदर्शकता आणतोय. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण स्वयंपुर्नविकास प्रकल्प करतो आहो. आज ३० जणांच्या मागे १ व्यक्तीला घर मिळतं हे प्रमाण बदलून ते १ ऐवजी ५ असं करायचं आहे. मुंबई वरचं प्रेशर कमी करण्यासाठी ट्रान्सहार्बर लिंक तयार होत आहे. त्यामुळं नवीमुंबईही मुंबईचाच भाग होईल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

घरांच्या किंमती परवडणाऱ्या हव्यात

म्हाडात बांधकामाची किंमत जास्त आहे. म्हाडाला जमीन फुकटात मिळते त्यामुळं त्यांच्या घरांच्या किंमतही सर्वसामान्यांना परवडणारीच हवी, अशी अपेक्षाही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली. आम्ही शासन म्हणून तुमच्या मागे खंबीर उभे आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT