exam-fees sakal
महाराष्ट्र बातम्या

म्हाडा भरतीचे परीक्षा शुल्क मिळणार परत

म्हाडा भरती परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द केली.

सकाळ वृत्तसेवा

म्हाडा भरती परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द केली.

मुंबई - म्हाडा भरती (Mhada Recruitment) परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द (Exam Cancel) केली. यामुळे उमेदवारांना (Candidate) त्रास सहन करावा लागला. उमेदवारांना परीक्षा शुल्क (Exam Fee) परत (Return) देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avad) यांनी दिले आहेत. मात्र आता केवळ परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.

रविवारी (ता.12) आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही सत्रातील परीक्षेला एक लाख 2 हजार 400 उमेदवार बसणार होते. म्हाडाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार उमेदवार दूरवरून हालअपेष्टा सहन करत परीक्षा केंद्रांवर पोहचले. मात्र पेपर फोडण्याचे प्रकरण समोर येताच म्हाडाने परीक्षा रद्द केली. यामुळे परीक्षा केंद्रांवर दूरवरून पोचलेल्या उमेदवारांनी संतप्त व्यक्त केला.

उमेदवार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ही परीक्षा म्हाडामार्फत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसेच केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT