Milk Price esakal
महाराष्ट्र बातम्या

Milk Price: राज्यातील दुधाचे दर वाढण्याची शक्यता; दूध संघांची पुण्यात बैठक

सकाळ डिजिटल टीम

पुणेः राज्यामधील दुधाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध दूध संघांची बैठक पुण्यातील कात्रज येथे पार पडत आहे. सध्या अनेक दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून जास्तीच्या दराने दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम दरवाढीवर होणार असल्याची शक्यता आहे. बैठकीत उपस्थित सदस्यांनी दूध खरेदीचे दर वाढवण्याची मागणी केली आहे.

देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजार पसरला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्याने दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळं दुधाचे दर आणखी वाढू शकतात.

पुण्यातील कात्रज येथील दूध डेअरीमध्ये शासकीय आणि खाजगी दूध उत्पादन संघांची बैठक पार पडत आहे. अमूल सारख्या कंपन्या जास्त दराने दूध खरेदी करत असल्यामुळे आपल्यालाही आगामी काळात दूध खरेदीचे दर वाढवावे लागतील, अशी चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आगामी काळात दूध दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही दूध उत्पादक कंपन्यांना मदत करावी, अशा प्रकारची मागणी या बैठकीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT