Milk Production sakal
महाराष्ट्र बातम्या

Milk Production : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान;मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता,महासंघांकडून मिळणार ३० रुपये

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. एक जुलैपासून हे दर लागू असतील.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. एक जुलैपासून हे दर लागू असतील. दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुपयांचे अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विखे पाटील यांनी राज्यभरातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती. या बैठकीत विखे पाटील यांनी शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर शासनाकडून पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर ३५ रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT