महाराष्ट्र बातम्या

Vidhan sabha election 2024: MIM महाविकास आघाडीसोबत? इम्तियाज जलील यांच्याकडून 'या' २८ जागांसाठी पत्र

Mahavikas Aaghadi: महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरु आहे. अद्याप कुणाचाही अंतिम फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जागांवरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने आघाडीत आपल्या हक्काचा वाटा मागण्यास सुरुवात केली आहे.

संतोष कानडे

Maharashtra Assembly Election 2024: राज्य विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळेच विद्यमान सरकारने एकापाठोपाठ एक मंत्रिमंडळाच्या बैठका घेत मोठमोठे निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीनेही पूर्ण ताकदीने शड्डू ठोकून निवडणुकीचं मैदान मारण्याची तयारी केली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरु आहे. अद्याप कुणाचाही अंतिम फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जागांवरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने आघाडीत आपल्या हक्काचा वाटा मागण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छूक असल्याचं दिसून येतंय. शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज्यातल्या २८ जागांवर दावा केल्याची माहिती असून तेवढ्या जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केल्याचं बोललं जातंय.

एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे 28 जागांसाठीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. यापूर्वीही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची माझी भेट झाली असं सांगितलं होतं. मात्र त्यावर महाविकास आघाडीतल्या कुण्याही नेत्याने उत्तर दिलं नव्हतं.

राज्यातील 28 विधानसभा मतदारसंघासाठीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिले आहे. जिथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे अशा राज्यातल्या 28 जागांवर एमआयएमला उमेदवारी द्यावी, असे लेखी पत्र दिल्याचे सांगितले जात आहे.

इम्तियाज जलील यांनी दावा केलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा मुंबई आणि ठाण्यामधील आहेत. मुंबादेवी, धारावी, भायखळा, कलीना, चांदिवली, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मानखुर्द, अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, भिवंडी पश्चिम आणि पूर्व, मुब्रा कळवा, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, नांदेड उत्तर, नांदेड मध्य, पुणे कॅन्टोन्मेंट, सोलापूर मध्य, अमरावती, अकोला पश्चिम, वाशिम, अकोट, बाळापूर, मालेगाव, धुळे शहर या जागांचा प्रस्ताव एमआयएमने दिल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : समीर पाटलांनी पाठवलेली नोटीस धंगेकरांना मिळाली, काय देणार उत्तर?

SCROLL FOR NEXT