minimum frp milk
minimum frp milk 
महाराष्ट्र

दुधाला प्रतिलिटर किमान 25 रुपये ‘एफआरपी’

सकाळ डिजिटल टीम

पुणे - दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर किमान २५ रुपये आधारभूत किंमत (एफआरपी) देण्यावर राज्यातील दूध संस्था आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी मुंबईत झालेल्या पहिल्याच बैठकीत एकमत झाले. आजच्या या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. परंतु, याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन, अंतिम निर्णय घेण्यास राज्याचे दुग्धविकास आयुक्त डॉ. हनुमंत तुमोड यांनी अनुकूलता दर्शविली आहे.

दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट कायमस्वरूपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही एफआरपी व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला होता. यावर चर्चा करण्यासाठी डॉ. तुमोड यांनी आज सल्लागार समिती आणि विविध दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत बोलाविली होती, असे सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

या बैठकीला सहायक दुग्धविकास आयुक्त श्रीकांत शिपूरकर, महानंद़ा दूध डेअरीचे अध्यक्ष रणजित देशमुख यांच्यासह दूध सल्लागार समितीचे सर्व सदस्य आणि राज्यातील सहकारी व खासगी दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT