balasaheb thorat e sakal
महाराष्ट्र बातम्या

'फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही'

भाग्यश्री राऊत

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा (obc reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन केलं, तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी ओबीसी परिषद घेतली. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देऊ, नाहीतर राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा केली होती. त्यावरून आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (minister balasaheb thorat) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. (minister balasaheb thorat criticized devendra fadnavis on obc reservation issue)

देवेंद्र फडणवीस यांचं संन्यासाबाबतचं विधान तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. यापूर्वीही त्यांनी विदर्भ स्वतंत्र होत नाही तोपर्तंय लग्न करणार नाही, असं म्हटलं होतं. पण ते झालंच ना, असा टोला थोरात यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं, धनगर समाजाला सांगितलं होतं. पण पहिल्या बैठकीत सोडाच, त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. त्यांनी फक्त धनगर समाजाची दिशाभूल केली. सत्तेसाठी वारेमाप बोलायचं आणि वाटेल ते आश्वासन द्यायचं. त्यानंतर कृतीतून मात्र काहीही करायचं नाही, असे भाजपचे धोरण आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळविण्यासाठी ते अशी वक्तव्य करतात, अशी टीकाही बाळासाहेब थोरातांनी केली होती.

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस? -

भाजपने ओबीसी आरक्षणासाठी शनिवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील व्हेरायटी चौकात देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी फडणवीस चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यातील मंत्रीच ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. त्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली असती तर आता ओबीसी आरक्षण कायम असतं. पण, आता कोरोनाचे नवीन निर्बंध लावले आणि त्यातच पाच जिल्ह्यांच्या निवडणुका घोषित केल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात समस्या निर्माण होईल. आपण सर्व मिळून ओबीसी आरक्षण परत आणू. मात्र, त्यासाठी आमच्या हातात सूत्र द्या. ओबीसी आरक्षण परत मिळवून दिलं नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका-टिप्पणी केली. फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही. कारण महाराष्ट्रावर अन्याय होईल, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

Pune Police Raid : पुणे पोलिसांचा मास्टरस्ट्रोक! २५० जवानांनी उमरठीत अवैध शस्त्र कारखान्यावर टाकला सर्वात मोठा छापा

SCROLL FOR NEXT