chhagan bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

जीवाशी खेळून शिवसेना सोडली, छगन भुजबळांनी सांगितली आठवण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मंत्री छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) यांनी शिवसेना (shivsena) आणि काँग्रेस (congress) दोन्ही पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, दोन्ही पक्षासोबतच्या आठवणी ते विसरू शकले नाहीत. गेल्या तीन दिवसांपूर्वीच मी काँग्रेस किंवा शिवसेनेत असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो, असं विधान त्यांनी केलं होतं. आता परत त्यांनी शिवसेना का सोडली? याबाबत वक्तव्य केलं आहे. आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

मी शिवसेना ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी सोडली. त्यावेळी नागपुरात कुठे कुठे गेलो होतो ते सर्वांनाच माहिती आहे. त्यावेळी मी जीवाशी खेळून पक्षांतर केलं होतं. तेव्हापासून ओबीसींच्या हक्कांसाठी लढतोय. आता ओबीसींना आरक्षण लागू झाले. पण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा लढत आहे. महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मंत्र्यांवर दबाव टाकणे, धाडी टाकणे सुरू आहे. आमच्यावेळी सुद्धा तुरुंगात गेल्यानंतरही धाडी टाकण्यात आल्या. गेल्या ७५ वर्षांपासून पहिल्यांदा देशात अशा प्रकारचं वातावरण आहे. लहान-लहान घरात आयटीचे अधिकारी बसतात याचं नवल वाटतं. पण, शत्रूत्वाच्या भावनेतून हे करणं चुकीचे आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरामुळे भाजपची प्रतिमा लोकांमध्ये डागाळेल, याचा विचार फडणवीसांनी करावा, असेही भुजबळ म्हणाले.

आम्ही सकाळी शपथविधी केला असला तरी त्यात सुधारणा केली. जोपर्यंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. सरकार पडण्याची कुठलीही भीती नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT