Samant 
महाराष्ट्र बातम्या

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणाले, राज्यपालांकडे आमच्या 12 आमदारांच्या फायली पडूनच; त्याला त्यांनी तत्काळ मंजुरी द्यावी ! 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यपालांना मुख्यमंत्री कार्यालयाने विमान नाकारल्याने आता महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, की सर्वांसाठी नियम समान असून त्यानुसार वागायला हवे. राज्यपालांकडे आमच्या 12 आमदारांची फाइल मागील काही दिवसांपासून पडून आहेत. त्याला त्यांनी लवकर मंजुरी द्यावी. 

माझ्याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा पदभार आहे. विद्यापीठांच्या कामानिमित्त व विद्यार्थी प्रश्नांवरही मला वारंवार त्यांच्याकडे जाऊन यावे लागते. माझे कोणतेही काम आजवर त्यांनी अडवले नाही. त्यांचा मी लाडका मंत्री आहे. पण, जे काही नियम आहेत त्यानुसार प्रत्येकाने वागावे, असे मला वाटते, असेही सामंत या वेळी म्हणाले. 

मंत्री सामंत हे विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आज (शुक्रवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. तर महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा कोणताही वाद नसून राज्यपालांना विमान नाकारणे ही नियमानुसार झालेली कार्यवाही आहे, असेही ते या वेळी म्हणाले. 

मंत्री म्हणाले... 

  • राज्यपालांचा आहे मी लाडका मंत्री 
  • विविध कामांसाठी राज्यपालांकडे जावे लागते 
  • राज्यपाल आणि माझे चांगले संबंध; माझी सांगितलेली कामे होतात 
  • सर्वांसाठी समान नियम असून त्यानुसार प्रत्येकाने वागायला हवे 
  • राज्यपालांना विमान नाकारले; त्यांनी नियमांचे पालन करायला हवे होते 
  • आमच्या विधान परिषदेच्या 12 आमदारांची फाइल त्यांच्याकडे पडून आहेत; त्याला लवकर मंजुरी द्यावी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT