Untitled-1.jpg
Untitled-1.jpg 
महाराष्ट्र

माझे पवार साहेबांवर प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम; कुठला मंत्री म्हणतोय पाहा...

सकाळ वृत्तसेवा

कळवा : "पवार साहेबांनी माझ्यावर आई-वडीलांएवढे प्रेम केले आहे. ज्या प्रमाणे एखाद्या प्रेयसीवर जेवढे प्रेम तिचा प्रियकर करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम पवार साहेबांवर माझे आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत त्यांना अंतर देणार नाही. पवार साहेबांनी सांगितले जितेंद्र तू मर, तर मी मरायलाही तयार आहे." असे उद्गार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काढले.

कळवा येथील खारीगाव परिसरातील 90 फीट रस्त्यावर आयोजित 'ठाणे फेस्टिव्हल'च्या समारोपप्रसंगी आव्हाड यांच्या नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित होते.

पवार म्हणाले की, ''ठाणेकरांनी जितेंद्र आव्हाड व एकनाथ शिंदे या दोन कर्तृत्ववान नेत्याना संधी दिली असून, गृहनिर्माण व नगरविकास या दोन खात्यांमध्ये जर समन्वय असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल. यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना हक्काचा निवारा मिळेल.''

या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. यावेळी संजय राऊत म्हणाले, ''शरद पवार यांना जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हाच हे सरकार बदलण्याच्या हालचाली खर्या अर्थाने सुरू झाल्या होत्या. ते पुढे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांचे पवारांवर प्रेयसीसारखे प्रेम नसते तर ते शिवसेनेचे केव्हाच मंत्री झाले असते, असे म्हणताच कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT