Minister Uday Samant
Minister Uday Samant esakal
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफ?

राजेश शेळके

रत्नागिरी : प्रथेप्रमाणे गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) व्हायला हवा. परंतु, कोरोना महामारीचं संकट असल्याने यंदाही सर्वांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. आम्ही श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला असून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांबाबत टोल माफीचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र, त्यांच्या तपासणीबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. केंद्र शासनाचा मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यात गेल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आता ऐनवेळी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यात यंदा १ लाख ६६ हजार खासगी, तर ११४ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनाचे संकट अजून कायम असून कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा. तसेच एसटी सेवा १ तारखेपासून पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. यावेळी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी देण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने नगरविकास मंत्री एकनात शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे.

केंद्र शासनाच्या मुंबई-गोवा महामार्गाला प्रचंड खड्डे आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तत्काळ खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या कामाला आता सुरवात झालीय. महामार्गावर चाकरमान्यांच्या स्वागतासाठी १८ ठिकाणी वेलकम पॉइंट असणार आहेत. तसेच रेल्वे स्थानकातही तशी यंत्रणा असणार आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेतली. दोन डोस घेतलेले, एक डोस घेतलेल्यांची आरटीपीसीआर करायची की नाही? याबाबतही निर्णय होईल. मात्र, एखादा कोरोना पॉझिटिव्ह आला, तर त्यांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

  • श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द

  • जिल्ह्यात १ लाख ६६ हजार खासगी, तर ११४ सार्वजनिक गणेश

  • मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सूचना

  • चाकरमान्यांच्या स्वागतासाठी १८ वेलकम पॉइंट

  • पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT