Sharad Pawar VS Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : 'त्या' 9 मंत्र्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली; जयंत पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केलेल्या अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या मंत्र्यांनी आज शरद पवारांची अचानक भेट घेतली. शरद पवार हे वायबी सेंटरमध्ये उपस्थित होते. मंत्र्यांनी जावून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची विनंती केली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली.

बैठकीनंतर बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सोबत काम करण्याची विनंती केली. त्यानतंर हे नेते वायबी सेंटरमधून गेले.

या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि अचानक अंबादास दानवे यांची बैठक सोडून मी वायबी सेंटरला दाखल झालो. पक्षातून बाहेर पडलेल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलीगिरी व्यक्त करून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती केली. त्यावर शरद पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाटील पुढे म्हणाले की, ही भेट अनपेक्षीत होती. त्यामुळे यावर आम्ही विचार केला नव्हता. आम्ही एकत्रित बसू त्यावेळी चर्चा करु आणि मार्ग काढू. बाहेर पडलेल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी खंत व्यक्त केली असून शरद पवार यावर विचार करतील, असं जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT