MLAs disqualification Verdict  esakal
महाराष्ट्र बातम्या

MLAs disqualification Verdict : भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध; नार्वेकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं...

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं त्यांनी निकालातून स्पष्ट केलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं त्यांनी निकालातून स्पष्ट केलं. तर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड वैध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

निकाल वाचनावेळी नार्वेकर म्हणाले, २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचं स्पष्ट होतंय.

''भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे. २१ आणि २३ जून २०२२ रोजीचे शिंदे गटाची पत्रे विधिमंडळ सचिवालयात आहेत. या दिवशी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचं झालं. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी झालेली नियुक्तीही वैध आहे.'' असं नार्वेकरांनी स्पष्ट सांगितलं.

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला.

दरम्यान, शिंद गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकरांनी निकालामध्ये सांगितलं. त्याला पुष्टी देताना म्हटलं की, शिवसेनेची २०१८ ची घटनादुरुस्ती मान्य करता येत नाही. ती नियमांना धरुन नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचं मत महत्त्वाचं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पक्षाची मूळ घटना आम्ही मागवून घेतली. त्यामधील तरतुदीनुसार एकनाथ शिंदेंचा गट मूळ पक्ष ठरत आहे.

नार्वेकरांच्या निकालातील ठळक मुद्दे...

  • संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही.

  • ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झाले.

  • सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही.

  • बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण अपात्रतेचे कारण ठरु शकते.

  • २१ जून २०२१च्या बैठकीच्या हजेरीपत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत; यांमुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT