Amol Mitkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

आई-बहिणीवरुन शिवीगाळ झाली; धक्काबुक्कीनंतर मिटकरींचा दावा

अमोल मिटकरी आणि महेश शिंदे या दोन आमदारांमध्ये आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे समोरासमोर आले. या धक्कादायक प्रकारानंतर अमोल मिटकरींनी आपण या प्रकाराबद्दल एकनाथ शिंदेंकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. तसंच आपल्याला शिवीगाळ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

या धक्काबुक्कीनंतर मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत होतो. काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाच आहे, त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करायची. म्हणून आम्ही साडेदहाला पायऱ्यांवर जमायचं ठरवलं होतं. मात्र सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली. कोणीतरी शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने तिथे धक्काबुक्की केली, आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली.

मिटकरी पुढे म्हणाले की, आम्ही संस्कृती जपणारी, पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत. या घटनेनंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ कऱणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही जाब विचारणारच. आमची ५० खोके एकदम ओक्के घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. आमचं आंदोलन शांततेत सुरू होतं. हे राज्याला न शोभणारं आहे. शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की केली, पत्रकारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर अजितदादांनी समजावून सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेलं. सुरुवात त्यांनीच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT