Amol Mitkari esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Mitkari: हर हर महादेव चित्रपटावर मिटकरींचा आक्षेप; म्हणाले इतिहासाला धरुन...

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी अभिजित देशपांडेंनी दिग्दर्शित केलेल्या हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. मिटकरी यांनी ट्विट करुन हा आक्षेप नोंदवला. चित्रपटात दाखवलेली अनेक दृश्य ही इतिहासाला धरुन नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.

Har Har Mahadev Marathi Movie

''VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते. अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभू यांची शब्दफेक व जेधे-बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही.'' हे आक्षेप आमदार अमोल मिटकरी यांनी नोंदवले आहेत.

‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजचा ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. सध्या ऐतिहासिक चित्रपटांची मालिका सुरू असल्याने या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत काहीच कल्पना नव्हती, परंतु पहिल्याच दिवशी 'हर हर महादेव'ची गर्जना देशभरात घुमली.

सध्या या चित्रपटाचे 400 चित्रपटगृहांमध्ये, पाच भाषांमध्ये 1200 शो सुरू आहेत. हे सर्व शोज् हाऊसफुल्ल असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी अशी मोठी धडाकेबाज कमाई केली. पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठणे ही मोठी बाब आहे, त्यामुळे प्रतिसाद अजून वाढला तर या चित्रपटाचे आणखी काही शो लावण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद, ३ माओवाद्यांना कंठस्नान

Shani Impact Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' वर शनीचा प्रभाव पडेल; लवर्स 'या' 4 चुका करु नका

NMMC Mayor: नवी मुंबईच्या महापौरपदी विजयी झालेल्या सुजाता पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

Air Pollution & Mental Health: प्रदूषणामुळे डिप्रेशन-एंग्जायटीचा वाढतोय धोका! हवेतील PM2.5 चा मेंटल हेल्थशी थेट संबंध; तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT