Bacchu Kadu News esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : ...तर विधानसभेतून माघार घेईन अन् माझी जागा महायुतीला देईल; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

mla bacchu kadu on mahayuti govt : आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी प्रचार करेल, असेही ते म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल,’’ अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार. आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर माझीही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी प्रचार करेल, असेही ते म्हणाले.

‘क्रांतिदिनी (ता. ९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी, अपंग, निराधार जनतेसाठी मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येईल. आर्थिक विषमता निर्माण करण्याचा प्रकार सुरू आहे. ज्यांना हात-पाय आहेत, त्यांना महिन्याला पैसे देणार अन् दिव्यांगांना का नाही? ही तफावत दूर करण्यासाठी हा मोर्चा असेल. संभाजीनगर मोर्चामध्ये दीड लाख लोक सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जाती धर्मासाठी नाही. माझा रोख कुठल्या योजनेकडेही नाही; पण व्याधी पाहून मदत करा. त्यांचे कष्ट मोजा इतकेच आमचे म्हणणे आहे,’’असे कडू यांनी सांगितले.

मुंबईतील जागा ताब्यात घ्या

ज्या पारशी लोकांनी इंग्रजांच्या सांगण्यावरून भारतीयांना त्रास दिला होता, त्या पारशांना इंग्रजांनी मुंबईत सहा हजार एकर जमीन दिली होती. सरकारने ही जमीन ताब्यात घ्यावी. आम्ही सरकारला याचे उत्तर मागणार आहोत. सरकारने ऐकले तर ठीक; अन्यथा आम्ही जमिनी ताब्यात घेऊ. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यासंदर्भातील सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणुकीसाठी मी करतोय, असे म्हणत असाल तर ‘होय’ करतोय. हे मुद्दे निवडणुकीत आलेच पाहिजे, अशी भूमिका कडू यांनी मांडली.

बच्चू कडू म्हणाले...

- मराठा आरक्षणाबाबत सरकार आणि विरोधी पक्षांनी ठाम भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. पण कुणीही भूमिका घेत नाही.

- एकनाथ शिंदे आतापर्यंतचे ‘बेस्ट’ मुख्यमंत्री आहेत

- उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून ठीक आहेत, मुख्यमंत्री म्हणून नव्हे

- राज्य सरकारने आता ‘लाडका दिव्यांग’ आणि ‘लाडका पत्रकार’ योजना जाहीर करावी

- मंत्रिमंडळ विस्ताराशी आम्हाला घेणे-देणे नाही, पुढचा विस्तार आम्ही करू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT