state minister Bachchu kadu is in district Sakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session 2023 : भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा; बच्चू कडूंचा अधिवेशनात सल्ला

आमदार प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. हाच प्रश्न आज काही आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडला आहे. यावेळी आमदार बच्चू कडूंनी एक अजब मागणी केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी बच्चू कडू यांनी या भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावं, असा सल्ला दिला आहे. एखाद्या शहरामध्ये तसा प्रयोग करण्यात यावा, असंही बच्चू कडू यांनी सुचवलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, "खरंतर भटक्या कुत्र्यांवर एक सोपा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. फक्त समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला पाहिजे. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यायला हवा. "

बच्चू कडू पुढे म्हणाले, "रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ-नऊ हजारांना तिथं कुत्री विकली जातात. आम्हाला गुवाहाटीला गेल्यावर कळलं की आपल्याकडे जसं बोकडाचं मांस खातात, तसं तिकडं कुत्र्याचं मांस खातात. त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्याला बोलावून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT