fadanvis esakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार जाधवांसारखा एक अभ्यासू लोकप्रतिनिधी गमावला - देवेंद्र फडणवीस

एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांचे हैदराबाद इथं निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या अकाली निधनानं राजकीय वर्तुळातील नेत्यांनी सोशल मिडीयाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटद्वारे भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'कोल्हापूर उत्तर'चे आमदार चंद्रकांत जाधव जी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

दरम्यान, आमदार जाधव यांच्या निधनाने धक्का बसला अशी प्रतिक्रीया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. तसेच आमदार चंद्रकांत जाधव निधनाची बातमी धक्कादायक आहे. परमेश्वर त्यांच्या कुंटुंबियांना यातून सावरण्याची ताकद देवो. त्यांचे अवेळी जाणे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

आमदार जाधव यांचे पार्थिव कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कारखान्यात आले आहे. तेथून ते काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आदींनी अंत्यदर्शन घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT