mla deepak kesarkar on shivsena uddhav thckeray amide maharashtra political crisis  
महाराष्ट्र बातम्या

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज - दीपक केसरकर

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे, बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचं मंत्रीपद आता धोक्यात आलं असून ते जाण्याचीही शक्यता आहे. संजय राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. याबद्दल आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे गटाती गुवाहाटी येथे बैठक झाली त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, आम्ही शिसेनेतून बाहेर पडलोय हा गैरसमज आहे आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच सदस्य आहोत, असे केसरकर यावेळी म्हणाले आहेत. जेव्हा एवढी लोकं एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधे काहीतरी असेल जे सर्व लोकांन खटकलं असेल, आम्हाला कोणी असं करा म्हणून सांगितलं नाही, आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना मुळात नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, असे केसरकर यावेळी म्हणाले.

यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आमदार होते. दोन तृतियांश मताच्या मुद्द्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, घटनात्मक तरतुद अशी आहे की वेगळं मत मांडण्यासाठी हे आवश्यक असतं, ते दोन तृतियांश बहुमत आमच्याकडे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

केसरकर पुढे म्हणाले की, ५५ आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो १६ लोकं एकत्र येऊन तो नेता बदलू शकत नाही, त्यामुळे उपाध्यक्षांच्या निर्णायाला कोर्टात आव्हान देणार असून तो निर्णय आम्हाला मान्य नाही. तसेच घटनात्मकदृष्ट्या दोन तृतियांश बहुमत असलेल्या गटाला आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे असे केसरकर यावेळी म्हणाले. शिवसेना हा जो पक्ष आहे त्याचं नेतृत्व शिंदे करत आहेत, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे लोक एकत्र आले आहोत, या गटाची संख्या दोन तृतियांशापेक्षा जास्त असल्याने आमचा वेगळा गट आहे आणि त्या गटाचे नेते एकनाथ शिंदे असतील असे केसरकर म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT