Uddhav Thackeray VS Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : विधान परिषदेतील दोन शिवसेना आमदारांची अपात्रतेच्या धोक्यातून सुटका? जाणून घ्या कारण

रोहित कणसे

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसोमर सुरू आहे. या सुनावणीचा निकाल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादम्यान विधानपरिषदेतील दोन शिवसेना आमदारांची अपात्रतेचा धोक्यातून सुटका होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेतील शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यात संपणार आहे. तसेच अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याने त्यांची अपात्रतेच्या धोक्यापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार डॉ. मनीषा कायंदे व विप्लव बजोरिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात अपात्रतेच्या याचिका सादर केल्या आहेत. विधानपरिषद सभापतीपद रिक्त असून डॉ. गोऱ्हे स्वत:च आपल्याविरोधातील याचिकेवर निर्णय देवू शकत नसल्याने त्यावर सुनावणी होणार नाही. तर डॉ. गोऱ्हे व अन्य दोन आमदारांविरूद्धही एकत्रित याचिका असल्याने आणि ठाकरे गटाला तिघांविरोधातील याचिकेवर सुनावणी हवी असल्याने ती प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

तसेच विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता असून सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत. मनीषा कायंदे यांचा आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2024 ला संपतोय. तर विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ 21 जून 2024 रोजी संपत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT