MLA Disqualification Case  esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : ''लपून-छपून बैठक झालेली नाही'', मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नार्वेकरांच्या भेटीचं कारण

आमदार अपात्रतेच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून कायद्याप्रमाणे निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संतोष कानडे

मुंबईः आमदार अपात्रतेच्या पूर्वी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून कायद्याप्रमाणे निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या 'वर्षा'वरील भेटीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज दुपारी चारनंतर अध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर मी यावर भाष्य करेन. आपल्याला एवढंच सांगतो की, निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह आणि पक्ष दिलेला आहे. बहुमताच्या जोरावर आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे.

''काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात.. त्यांचे आमदार अध्यांक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते तेव्हा काय झालं होतं? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अधिकृतपणे त्यांच्या वाहनातून आले होते. त्यांच्या मतदारसंघातील कोस्टल हायवेचं काम आणि इतर प्रश्नांसाठी ते आले होते. अधिकाऱ्यांसोबत आमची ऑफिशिअल बैठक झाली.. लपून-छपून बैठक झालेली नाही.'' असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं.

शिंदे पुढे म्हणाले की, चोराच्या मनात चांदणं आहे.. विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ती संस्था चांगली असते आणि विरोधात निकाल गेला की संस्था वाईट असते. माझी मागणी आहे की, अध्यक्ष महोदयांनी मेरिटवर निकाल दिला पाहिजे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या १४ आणि शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज बुधवारी निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष स्वतः निकाल वाचून दाखवणार आहेत. सकाळी प्रतिक्रिया देताना नार्वेकरांनी परिशिष्ट १० मधील कलमांचा आधार घेऊन निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं. काही कलमाचं इंटरपिटीशन झालेलं नसून त्यांची योग्य अंमलबजावणी केली जाईल, असं ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT