MLA Disqualification case Result  Sakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case : ''शिवसेनेची मूळ घटना मान्य, बाकीच्या घटनादुरुस्त्या मान्य नाहीत'', नार्वेकरांचे स्पष्ट संकेत

MLA Disqualification Result : ''मूळ घटना मान्य, दुरुस्त्या नाकारल्या'' - नार्वेकरांचा निकालात ठाम भूमिका...

संतोष कानडे

मुंबईः शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम निकालाची सुनावणी सुरु आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच वाजल्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात केली. शिवसेना मूळ पक्ष कुणाचा? यासंबंधीच्या पुराव्यांवर त्यांनी मुद्दे मांडले.

शिवसेना संघर्षासंबंधी ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश असून व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत, असं नार्वेकरांनी निकाल वाचताना सांगितलं.

नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ साली शिवसेनेने घटनेमध्ये केलेले बदल आम्हाला मान्य नाहीत.

''दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. ठाकरेंनी दिलेली घटना आम्हाला मान्य नाही. निवडणूक आयोगाकडे २०१८पूर्वीची घटना उपलब्ध असून निवडणूक आयोगाने दिलेली घटना मी मान्य करतो, आयोगाकडे मागणी केल्यानंतर ती मूळ घटना प्राप्त झालेली आहे.''

नार्वेकर पुढे म्हणाले, उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य आहे २०१८ अंतर्गत निवडणूक नाही, त्यामुळे घटनादुरुस्ती चुकीची आहे. शिवसेना पक्षप्रमुख अर्थात अध्यक्ष पदासंदर्भातील निर्णय मी देणार असून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे.

असं सांगत राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट, या दोन्ही गटांचं तुलनात्मक विश्लेषण केलं. पक्षावर कुणाचा हक्क यासंदर्भात त्यांनी मांडणी केली असून त्यासंदर्भातला अंतिम निर्णय देणार असल्याचं म्हटलं आहे. पाऊण तासामध्ये आमदार अपात्रतेसंबंधी त्यांनी भाष्य केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : दिवाळीत ठाणे ATS ची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी अटकेत

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT