MLA Disqualification Case Result 
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case Result: कुणाच्याही बाजूने निकाल न लागण्याची शक्यता! विधानसभा अध्यक्ष कसा भेदणार राजकीय पेच?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारे सरकार राज्यात स्थिर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर निकाल सर्वांना न्याय देणारा असेल, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे.

Sandip Kapde

MLA Disqualification Case Result: उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील आमदार अपात्राता वादाचा निर्णय आज (१० जानेवारी) जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पेच वाढला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारे सरकार राज्यात स्थिर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर निकाल सर्वांना न्याय देणारा असेल, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे. 

दरम्यान आज कुणाच्याही विरोधात निकाल न लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात फैसला करावा, असा निर्णय अध्यक्ष देऊ शकतात. तर एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. साम टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचा निकाल सर्वांना न्याय देणारा असेल, घटनेला धरुन निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केलं आहे. दरम्यान हा निकाल काय असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. साम टिव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल बॅलन्स असेल. कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाही. तर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात निर्णय होणार.

नार्वेकरांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र केले तर ठाकरे गटाचे वर्चस्व वाढेल. विधानसभा अध्यक्षांना अजित पवार गटातील आमदारांना देखील अपात्र करावं लागेल. त्यामुळे दोन्ही गोष्टी भाजपसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे कदाचित निकाल कुणाच्याही बाजूने न लागण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर शरद पवार गटातील आमदारांबाबत देखील, असा निर्णय येऊ शकतो. पुढे विधानसभा निवडणुका आहेत. अनेक आमदारांनी त्यांची विधीमंडळातील कामगीरी पूर्ण केली आहे. आता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यानंतर पावसाळी अधिवेशन होईल. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार गट दोघांना अपात्र करण्याची नामुष्की विधानसभा अध्यक्ष ओढवण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र करुन विधिमंडळाचे कामकाज केले तर सत्ताधाऱ्यांना देखील त्याचा फटका बसेल. सरकारची नकारात्मक प्रतिमा तयार होईल.

त्यामुळे बॅलन्स निर्णय देऊन कुणाच्याही बाजुने निकाल न येण्याची शक्यता आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तर सत्ताधारी पक्ष हे प्रकरण आणखी लांबवण्याचा प्रयत्नात असेल. एकदा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली की सर्व पक्ष तयारीला लागतील. या प्रक्रियेदरम्यान विधिमंडळाच्या कार्यकाळात काय घडलं ते विसर्जीत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT