Uddhav Thackeray 5 Mistakes  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray 5 Mistakes: उद्धव ठाकरेंच्या 5 चुका...नाहीतर 'शिवसेना' असती फक्त ठाकरेंची! नेमकं कुठं चुकलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात काल (बुधवार) मोठा दिवस होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल दिला. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.

Sandip Kapde

Uddhav Thackeray 5 Mistakes: महाराष्ट्राच्या राजकारणात काल (बुधवार) मोठा दिवस होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल दिला. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. शिवसेना हीच शिंदे गट असल्यावर नार्वेकरांनी शिक्कामोर्तब केला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्य मुद्द्यांचे त्यांनी विक्ष्लेषण देखील केले. यावरुन उद्धव ठाकरे यांच्या ५ चुका समोर आल्या आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी ह्या चुका केल्या नसत्या तर कदाचित शिवसेना आज उद्धव ठाकरेंची असती. या निकालात उद्धव ठाकरे यांनी केवळ एक दिलासा मिळाली की त्यांचे १४ आमदार पात्र ठरले. मात्र निकाल शिंदेंच्या बाजूने वरचढ ठरला.

  1. उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये पक्षाची घटना बदलली आणि स्वत:ला पक्षप्रमुख केले. या बदलाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी हा बदल असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असल्याचे सिद्ध होत नाही. यामुळे नार्वेकरांनी १९९९ ची घटनेचा आधार घेतला आणि २०२३ मध्ये शिंदे गटाने केलेली दुरुस्ती मान्य केली. यामुळे शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली.

  2. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना पक्षात अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. १९९९ मध्ये पक्षाची घटना बदलली त्यानंतर पक्षात निवडणुका झाल्या. या बदलानुसार कार्यकारणी पक्ष प्रमुखाची निवड करत होती. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल करत स्वत:ला पक्षप्रमुख बनवले. मात्र याची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही. त्यामुळे आयोगाने उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख मानले नाही.

  3. शिवसेनेच्या घटनेनुसार कार्यकारणी जवळ संपूर्ण शक्ती होती. कार्यकारणीजवळ नियुक्त आणि बरखास्त करण्याचा अधिकार होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वत: निर्यण घेत एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदेंची हकालपट्टी बेकायदेशीर मानण्यात आली.

  4. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली. या बैठकीत सर्व आमदार आणि खासदार होते. खासदार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते.मात्र राहुल शेवाळे आणि अन्य खासदार कार्यकारणीचा हिस्सा नव्हते. तरी देखील बैठकीत काही निर्यण घेण्यात आले. कार्यकारणी सदस्य उपस्थित नसताना घेतलेली बैठक अमान्य ठरवण्यात आली.

  5. विधानसभा अध्यक्ष जेव्हा निकालाचे वाचन करत होते. तेव्हा उद्धव ठाकरे विधानसभेत उपस्थित नव्हते. ते उलट तपासणीस देखील हजर नव्हते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र पाठवले मात्र त्यांच्या अनुपस्थितीचे कारण त्यात नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ते प्रतिज्ञापत्र फेटाळले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

'बंद कर ना बे...' संजय दत्त पापाराझींवर भडकला, सोशल मीडियावर Viral Video होताच नेटकरी म्हणाले...'बोलण्याची पद्धतच...'

Leopard Found Dead: निरगुडसरमध्ये ऊसाच्या शेतात मादी बिबट्याचा मृतदेह; वनविभागाकडून पंचनामा, मृत्यूचं कारण शोधण्याचे प्रयत्न

पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Pune Crime: पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; एकाला अटक, चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांची तपासणी अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT