mla disqualification case shivsena rahul narwekar said why eknath shinde won 
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंची शिवसेना खरी, मग त्यांच्या व्हीपमुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाहीत? राहुल नार्वेकरांनी दिलं स्पष्टीकरण

MLA Disqualification Case Shivsena: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला. शिंदेंची शिवसेना खरी असेत तर मग त्यांच्या प्रतोदने काढलेल्या व्हीपमुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र का ठरले नाहीत? या प्रश्नाबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालानंतर माध्यमांशी संवाद साधला. शिंदेंची शिवसेना खरी असेत तर मग त्यांच्या प्रतोदने काढलेल्या व्हीपमुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र का ठरले नाहीत? या प्रश्नाबाबत त्यांनी खुलासा केला आहे. तसेच दिलेला निकाल शाश्वत असल्याचं ते म्हणाले. (mla disqualification case shivsena rahul narwekar said why eknath shinde won)

सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणता पक्ष खरा याबाबत निर्णय घ्यायलं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने तीन गोष्टी तपासायला लावल्या होत्या. पक्षाचं संविधान बघायला लावलं होतं, त्यानंतर पक्षाचं नेतृत्त संरचना कशी आहे आणि त्यानंतर विधिमंडळाचे बहुमत कोणाकडे आहे. या मुद्द्यांचा अभ्यास करायचा होता, असं नार्वेकर म्हणाले.

या तिन्ही मुद्द्यांचा अभ्यास करुन मूळ पक्ष कोणाचा याबाबत निर्णय दिला आहे. निर्णय देताना सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. सर्व गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय. निर्णय देताना दोन्ही बाजूने ऐकून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा शाश्वत निर्णय आहे. हा योग्य आणि कायदेशीर टिकणारा निर्णय असेल. या निर्णयामुळे संसदीय लोकशाही अधिक ताकदवान होईल, असं ते म्हणाले.

कोणता पक्ष नाराज होतोय, कोणता पक्ष खूष होतोय. कोणता पक्ष कुणाचा आहे हे पाहणं माझं काम नाही. कायद्यात दिलेल्या तरतुदीनुसार पक्षाचं खरं प्रतिनिधित्व करतं हे पाहणं आणि त्यावरुन आमदार अपात्रतेचं निर्णय घेणं हे काम मी केलं आहे, असं ते म्हणाले.

ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाहीत?

आपण मूळ राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवल्यानंतर कोणाचा व्हीप आणि कोणाचा गटनेता वैध आहे याबाबत निर्णय दिला. शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून ओळख दिली आहे. पण, शिंदे गटाने व्हीप बजावल्यानंतर तो बरोबर पोहोचला नाही. योग्य पद्धतीने आमदारापर्यंत व्हीप पोहोचला नसेल. तर त्या आमदाराला अपात्र ठरवता येत नाही. याच कारणामुळे ठाकरेंच्या गटालील आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोर्टात जाण्याचा अधिकार सर्वांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटत असेल की माझा निर्णय चुकीचा आहे तर त्यांनी कोर्टात जावे. पण, मला खात्री आहे माझा निर्णय संविधानाला धरुन आणि शाश्वत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट देखील निर्णय कायम ठेवेल असा विश्वास नार्वेकरांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT