MLA Disqualification Case Uddhav Thackeray Plan B Sakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case Uddhav Thackeray Plan B: उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र झाले तर प्लॅन बी काय असेल?

गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेला सत्तासंघर्षात आज महत्वाचा टप्पा आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी कोणत्या गटातील आमदार अपात्र होतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Sandip Kapde

MLA Disqualification Case Uddhav Thackeray Plan B: आजचा दिवस राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे लागले आहे. गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेला सत्तासंघर्षात आज महत्वाचा टप्पा आहे.

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी कोणत्या गटातील आमदार अपात्र होतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोणत्यातरी गटाचे आमदार अपात्र ठरणार ही वस्तुस्थिती आहे. ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर प्लॅन बी काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेबाबत याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटाने देखील आम्हीच शिवसेना असल्याचं सांगत. ठाकरे गटातील १४ आमदांविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ यावेळेत सुनावणी पार पडली. दोन्ही गटाच्या सदस्यांची वयैक्तिक सुनावणी यावेळी घेण्यात आली.

आजच्या निकालामुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लावण्यात येत आहेत. ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर प्लॅन बी काय असेल, याबाबत जाणून घेऊया.

विधानसभा अध्याक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र केलं तर एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागले. मात्र सरकारला काही फरक पडणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. ४० आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडे पूर्ण बहुमत असेल.

मात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर  निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी कुणाच्याही बाजुने निकाल दिला तरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्यामुळे ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायमुर्ती असे आरोपीला भेटू शकत नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर त्यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. ठाकरे गटाला जनतेची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने देखील ठाकरे गटाविषयी आपुलकी व्यक्त केली होती. मात्र निकाल विरोधात लागला अन् ठाकरे गट कोर्टात गेला. तर त्यावर लगेच सुनावणी होणे आवश्यक आहे. सुनावणीला वेळ लागला तर परिस्थिती वेगळी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT