ANIL DESAI 
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification: सर्व उघड आहे, मग पुरावे कशाला हवेत; अनिल देसाईंची लवकर निर्णय घेण्याची मागणी

कार्तिक पुजारी

मुंबई- घटनेतील १० परिच्छेदानुसार निर्णय घेणे अपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशात हेच आहे. त्यामुळे पुरावे पडताळण्याची गरज नाही. काही गोष्टी स्पष्ट आहेत. २१ जूनला आमच्या मिटिंगला आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यांनीही ते नाकारलेले नाही. त्यामुळे त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं. त्यामुळे अध्यक्षांना यावर निर्णय घ्यायचा आहे, असं ठाकरे गटाचे सुनिल देसाई म्हणाले.

गुवाहाटी आणि सुरतला शिंदे गटाचे आमदार गेले. हे सर्वांसमोर आहे. त्यांनीही ते नाकारलेलं नाही. सभागृहात सुनिल प्रभुंनी व्हिप काढला होता. त्यानुसार मतदान झालं नाही हे उघड आहे. त्यामुळे अपात्रता शिंदे गटाच्या आमदारांवर लागू होतो. त्यामुळे यामध्ये काही पुरावे आवश्यक नाहीत. सर्वजणांना हे मान्य आहे, असंही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांनी कसलीही वेळ न दडवता यावर निर्णय घ्यावा असं निवेदन आम्ही दिलं आहे. शिंदे गटाच्या पक्षांनी काही मागणी अध्यक्षांकडे केली आहे. याला लांबवत नेणं, वेळ लावणं. यातून काहीही निष्पण झालं नाही तर सुखरुप राहणे अशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाने वेळ न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच गोष्टी आम्ही अक्ष्यक्षांपुढे मांडल्या, असं देसाई म्हणाले.

उघड प्रकरण असल्याने यावर निर्णय घेण्यात कसलाही अडथळा नाही. तसेच सर्व सुनावणी वेगवेगळी न घेता. एकत्रच सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. यावर लवकर निर्णय अपेक्षित आहे. अध्यक्षांनी ठरवलं तर एक ते दोन आठवड्यात यावर निर्णय होऊ शकतो, असंही ते म्हणाले. दरम्यान, सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिने लागण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT