manoj jarange patil esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA disqualification Verdict : आमदार अपात्रता प्रकरणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संतोष कानडे

मुंबईः आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. त्यामुळे अपात्रतेच्या कारवाईपासून सर्वच आमदार वाचले आहेत.

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचाही संघर्ष चालू आहे. त्यामुळं आमचं लक्ष फक्त अरक्षणाकडे आहे आणि शेवटी आम्ही 20 जानेवारीची तयारी करत आहोत. आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाहीये, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, निकालाबाबत आमच्यामध्ये कुठलीही धाकधूक नव्हती. आमची लढाई फक्त मराठा आरक्षणासाठीच आहे आणि 20 जानेवारीला पूर्ण ताकदीने मुंबईला जाऊन आरक्षण मिळवणार आहोत. अपात्रतेचा विषय राजकीय आहे, आमचा विषय सामाजिक आहे.. आमच्या लेकरांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.

''आरक्षण म्हणजे आमचा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. कित्येक पिढ्या आतापर्यंत बरबाद झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आमच्या लेकरांचा प्रश्न आहे.'' असं म्हणत त्यांनी पात्र-अपात्रता प्रकरणावर फारकाही बोलणं टाळलं.

दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालामध्ये कुणावरही अपात्रतेची कारवाई झालेली नाहीये. ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई न झाल्याने जोरदार टीका केली. हे भाजपचं मोठं षड्यंत्र आहे, असं म्हणत संजय राऊतांनी निकालाचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT