mla Kumar Ailani called srikanth shinde little cm and big cm to eknath shinde watch video  
महाराष्ट्र बातम्या

आमदाराकडून 'छोटे सीएम' असा उल्लेख; श्रीकांत शिंदेंनी लावला डोक्याला हात.. पाहा Video

सकाळ डिजिटल टीम

उल्हासनगर आणि कल्याण शहराला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे रविवारी खासदार श्रीकांत शिंदे आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करणअयात आले. दरम्यान या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उल्हासनगरचे आमदार आयलानी यांनी मोठे सीएम एकनाथ शिंदे तर छोटे सीएम श्रीकांत शिंदे असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शांतीनगरपासून कल्याणला जोडणाऱ्या पुलाचे आज खासदार श्रीकांत शिंदे गणपत गायकवाड आणि मी उद्घाटन केले. बाजूलाचा बांधलेल्या छोट्या पूलाच्या बाजूला हा पूल बांधण्यात आला असून याला सव्वा पाच कोटींचा खर्च आल्याचे आयलानी यांनी सांगितलं. उल्हासनगरचा विकास करणं आमचं लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

धोकादायक इमारतींना रेग्युलराइज करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर मधील रस्त्यांच्या कॉंक्रेटीकरणासाठी निधी देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांचा आमदार आयलानी यांनी छोटे सीएम असा उल्लेख केला. हे आमचे छोटे सीएम आहेत, तसेच एकनाथ शिंदे मोठे सीएम असल्याचे म्हटले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी डोक्याला हात लावल्याचे दिसून आले. दरम्यान आमदाराने छोटे सीएम असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT