Manda Mhatre  Manda Mhatre
महाराष्ट्र बातम्या

आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई : भाजपच्या नवी मुंबईतील आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली. यामुळे भाजपचा आमदार राष्ट्रवादीच्या गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत केलेल्या चर्चेत नेमक काय झाले, यावरून तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे या बेलापूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांची कार्यालयात भेट घेतली. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी विकासकामांच्या चर्चेबाबत भेट घेतल्याचे सांगितले. त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली. या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी विकासकामांसाठी भेट घेतली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

भेटीची जोरदार चर्चा

भाजप आमदार मंदा म्हात्रे या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे.

भेट घेतल्याने तर्कवितर्क

चार दिवसांपूर्वीच भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाहीर कौतुक केले होते. त्यातच आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यांचे आणि नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्या वितुष्ट अधिकच वाढले. दोन दिवसांपूर्वीच म्हात्रे यांनी नाईकांवर रुग्णालय उभारणीच्या कामावरून आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT