Narhari Zirwal Sakal
महाराष्ट्र बातम्या

Narhari Zirwal : अस्सल मराठमोळ्या पोशाखात जोडी जपानला; झिरवळ व त्यांच्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव

झिरवळ यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैष्णवी कारंजकर

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा पोशाख. झिरवळ यांनी ट्वीट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याला जाताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी. या साधेपणाचं सध्या कौतुक होत आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये आयोजित अभ्यास दौऱ्याला नरहरी झिरवळ आपल्या पत्नीसह गेले होते. तिथल्या एअरपोर्टवरचा एक फोटो झिरवळ यांनी ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये ते गांधी टोपी, पांढरा कुर्ता पायजमा अशा वेशात दिसले तर त्यांच्या पत्नीने नऊवारी साडी डोक्यावर पदर असा अस्सल मराठमोळा पोशाख परिधान केला होता.

त्यांच्या या साधेपणाचीच सध्या चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पक्ष कोणताही असो, पण या साधेपणाचं मनमोकळं कौतुक केलंच पाहिजे, असं म्हणत विरोधी पक्षांच्या समर्थकांनीही या ट्वीटखाली कौतुकाच्या कमेंट्स केलेल्या दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT