Pradnya Satav Sakal
महाराष्ट्र बातम्या

Pradnya Satav : आरोपीचे पालक प्रज्ञा सातव यांच्यापुढे ढसाढसा रडले; म्हणाले, मुलाला....

प्रज्ञा सातव यांच्यावर हल्लेखोराने हल्ला केला होता

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यात दौऱ्यासाठी जात असतांना एका ठिकाणी अचानक अज्ञात इसमाने हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीच्या आईवडिलांनी प्रज्ञा सातव यांच्याकडे माफी मागितली आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील कसबे धवंडा येथे प्रज्ञा सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. महेंद्र असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकारानंतर आरोपीचे आईवडील प्रज्ञा सातव यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले आहेत.

"आमचा मुलगा बकऱ्यामागे असतो त्याने नशेच्या भरात हे कृत्य केलं, त्याने केलं ते खूप चुकीचं आहे. आम्हाला माफ करा, आमचा मुलगा काही कमावत नाही, आम्ही त्याला बोललो पण आता आमच्या मुलाचं चुकलं असून आम्हाला एवढ्या वेळेस माफ करा" असं म्हणत आरोपीच्या आईने टाहो फोडला आहे. तर तुमच्या मुलाला काहीही झालं नाही असं प्रज्ञा सातव यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

"आम्ही आमचा गुन्हा माफ करतो, ताईंच्या पाया पडतो. घरी लहान लेकरं आहेत. ते उपाशी आहेत, सून कामाला जाते, त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं ते आम्हाला माहिती नाही" असं म्हणत आरोपी महेंद्र याच्या आईने प्रज्ञा सातव यांच्याकडे माफी मागितीली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT