Ajit Pawar: Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

Sharad Pawar Latest Update : प्राजक्त तनपुरे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे केले होते जाहीर

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Politics Update : अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्यानंतर पक्षातील अनेक नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. (Latest Marathi News)

तर 2019 मध्ये पवार साहेबांच्याच प्रयत्नाने आमच्या बहुतांश आमदारांचा विजय झाला होता. मी त्यांच्याच सोबत आहे. जे गेले, त्यांचे दुःख आम्हाला देखील आहे. आम्हाला देखील वेदना झाल्या आहे. पण गेलेल्यांपैकी काहीजण आमच्या संपर्कात आहे. निश्चित ते परत येतील आणि जे 2019 ला झाले तेच परत होणार असंही ते म्हणाले होते परंतु आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

प्राजक्त तनपुरे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. पण आज त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे तनपुरे नेमकं कोणाला पाठिंबा देत आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.(Latest Marathi News)

काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. जी मुंबईत बैठक झाली त्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. नंतर जी काही नाट्यमय घटना घडली त्यानंतर मी पवार साहेबांसोबत असल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले होते. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT