MLA home sakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Prakashdada Solanke : बिगर मराठा समाजाकडून घरावर हल्ला

इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - माझ्या घरावर झालेला हल्ला हा विरोधी पक्षातील कार्यकर्ते आणि बिगर मराठा समाजातील काही समाजकंटकांनी केला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगावचे (जि . बीड) आमदार प्रकाश सोळंके यांनी आज केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये घडलेले हिंसक आंदोलन हे गृह खात्याचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

ते म्हणाले, ‘‘माझ्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. माझे घर जाळणाऱ्यांमध्ये माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते, समाजकंटक होते. मात्र, हे सगळे बिगर मराठा समाजाचे कार्यकर्ते होते. त्या दिवशी माझ्या बंगल्यासमोर जमलेल्या जमावामध्ये मराठा समाजाशिवाय इतर समाजाचीही माणसे होती. त्याचबरोबर अवैध धंदे करणारे, वाळू, गुटखा, हातभट्टी, धान्याचा काळाबाजार करणाऱ्या समाजकंटकांचाही यात समावेश होता,’’ असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे मी पोलिस प्रशासनाला सीसीटीव्हीचे फुटेज दिले आहे. त्यामुळे सरसकट सर्वांना अटक न करता कॅमेऱ्यात दगडफेक करताना दिसणाऱ्यांनाच अटक करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

- प्रकाश सोळंके, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT