Praniti Shinde vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

आम्ही मेलोय का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही; आमदार शिंदे भडकल्या

सकाळ डिजिटल टीम

'मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.'

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता काॅंग्रेस आमदारानं देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. सोलापूरचं (Solapur) पाणी पळविण्याचा प्रयत्न केला, तर रान पेटवू असा इशारा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सरकारला (Maharashtra Government) दिलाय. मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय, असंही आमदार शिंदेंनी स्पष्ट केलंय. उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदेंनी माध्यमांपुढं आपली भूमिका स्पष्ट केलीय.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'उजनीचे पाणी 20 वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पाईपलाइनद्वारे सोलापूरला आणलं. आता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचं नियोजन होत नाहीय. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होतं. तेव्हा उजनी मायनसमध्ये होतं, तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून रात्रीत पाणी आणलं.'

दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही काय मेलो का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय. सोलापूरकरांचं पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिंदेंनी सरकारला दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT