Prithviraj Chavan Vs Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

'फडणवीसांनी नवाब मलिकांवर त्याचवेळी का कारवाई केली नाही?'

सकाळ डिजिटल टीम

मंत्री नवाब मलिकांवर झालेले आरोप 2003 मधील आहेत.

कऱ्हाड (सातारा) : पुण्याला मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या मेट्रोला माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत मंजुरी दिली होती. मात्र, त्यांनी तितक्या सन्मानानं आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं नाही. त्यामुळं भाजपकडून विकासकामांतही आता काँग्रेसव्देषी राजकारण होत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे पत्रकार परिषेदत केलीय.

चव्हाण पुढे म्हणाले, मंत्री नवाब मलिकांवर (Nawab Malik) झालेले आरोप पूर्वीचे म्हणजे २००३ मधील आहेत. त्यानंतर फडणवीसही (Devendra Fadnavis) सत्तेवर होते. त्यावेळी त्यांनी का कारवाई केली नाही. ते का झोपले होते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. कऱ्हाडच्या विमानतळाचा (Karad Airport) कलर कोडिंगचा नकाशा जाहीर झाला आहे. त्यामुळं कऱ्हाडातील बांधकामांना परवानगीचा विषयही मार्गी लागल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. येथे येऊन उद्‌घाटन करताहेत, त्याबद्दल खंत नाही. विकासकामांची उद्‌घाटनं अशीच निरंतर असतात. जो भूमिपूजन करतो, तोच उद्‌घाटक असेल, असे नसते. तो प्रश्न निराळा आहे. मात्र, विकासकामांत कधीच असले राजकारण नव्हते. ते असूही नये. मात्र, भाजप (BJP) तेच करत आहे, असे नमूद करून श्री. चव्हाण म्हणाले,‘‘विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत दाखल्याच्या नियमाच्या आदेशाने कऱ्हाडसह परिसरातील बांधकामाबाबत अनिश्चितता संपली आहे. बांधकाम परवाना पालिकाच देणार आहे. विमानतळ प्राधिकरण केवळ ना हरकत दाखला देणार आहे.

विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य संजीवकुमार व विमानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांची भेट घेतली. विमानतळ प्राधिकरणाचे संजीवकुमार यांना भेटून तो प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यांनी एका दिवसात तो प्रश्न मार्गी लावला. विमानतळ कलर कोडिंग नकाशा अंतिम जाहीर केला. त्यात रेड झोनसह अन्य कलर कोडिंग स्पष्ट केले. त्यामुळं कऱ्हाडसह परिसरातील बांधकाम परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT