Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

"अजित पवार मुख्यमंत्री झाले तर राज्याला फायदा होईल"

उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडी एकत्र आले तर राज्यात परिवर्तन होईल

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज्यात नाट्यमय घडामोडींना वेग आला. आरोप प्रत्यारोप आणि टीका सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. अशातच अनेक मोठे नेते शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही असंही बोलू लागले. अशातच आणखी एका नेत्याने एक वेगळं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी म्हंटलंय की, अजित दादांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तर राज्याला निश्चितच फायदा होईल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. या शुभेच्छांचा स्वीकार करुन झाल्यानंतर माध्यमांसह उपस्थितांशी संवाद साधत असताना रोहित पवार यांनी दादांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तर राज्याला फायदाच होईलं असं म्हंटलं आहे.

शिंदेच्या बंडानंतर सरकार कोसळलं आणि राष्ट्रवादी हा राज्यातील दोन नंबरचा मोठा पक्ष ठरला. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या गोटातून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जातय. तर महाविकास आघाडी सरकार असताना देखील राष्ट्रवादीमधून पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केली जात होती. अशातच आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दत्ता भरणे यांनी देखील येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असा पुनरुच्चार केला आहे.

दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार पडणार अन् महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार

दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली यांनी केलं आहे. रूपाली पाटील या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; गोविंद बागेतील पोस्टरची चर्चा

अजित पवारांच्या एका समर्थकांनं त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचं पोस्टर झळकवलं. यामध्ये अजित पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्यानं या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.गोविंद बागेत पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे शुभचिंतक भेट देतात. यावेळी शरद पवारही त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात. त्यानुसार एक कार्यकर्ता अजित पवारांना भेटण्यासाठी आला होता. त्यानं आपल्यासोबत एक बोर्ड आणला यावर अजितदादा, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. हा फलक त्यानं गोविंद बागेबाहेर लावल्यानं त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT