MLA Sada Saravankar appeared on MNS stage Shiv Sena and Shinde factions clashed in Dadar esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना-शिंदे गटात राडा; मनसेच्या स्टेजवर आमदार सदा सरवणकर दिसल्याने चर्चेला उधाण

धनश्री ओतारी

खरी शिवसेना कोणाची असा वाद ठाकरे आणि शिंदे गटात सुरू आहे. या वादाचे पडसाद गणेशोत्सातही पाहायला मिळालं. गणेश विसर्जनावेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आल्यानं काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे मनसेच्या स्टेजवर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(MLA Sada Saravankar appeared on MNS stage Shiv Sena and Shinde factions clashed in Dadar)

प्रभादेवी येथे मनसेने उभारलेल्या स्टेजवर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर आमदार सदा सरवणकर हजर होते. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचं चित्रही दादरमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, प्रभादेवीत शिवसेनेचे संजय भगत आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर आमनेसामने आले. त्यावेळी समाधान सरवणकरांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदेचे पुढे घेऊन जात आहे. पुढच्या वर्षीही याच जल्लोषात हिंदु सण साजरे करणार असं म्हणत म्याव म्याव घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रभादेवी परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मनसेच्या स्टेजवर असणारे आमदार सदा सरवणकर म्हणाले की, गणेशोत्सवात सगळीकडे हिंदुत्वाचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट आणि मनसे एकत्र दिसत आहेत. त्यामुळे गणेश विर्सजनाच्या स्टेजवर आम्ही एकत्र आलोय असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT