Santosh Bangar esakal
महाराष्ट्र बातम्या

संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात; काय आहे प्रकरण?VIDEO

शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे

धनश्री ओतारी

शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये संतप्त झालेल्या बांगर यांनी एकाच्या कानशिलात लगावली असल्याचे पाहायला मिळते.(Mla santosh bangar put the mid day meal in the ear of the manager of the restaurant)

कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा राग अनावर झाला.

नेमकं काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजन वाटप केले जाते. यासाठी शहराजवळील एमआयडीसी भागात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रित अन्न शिजवले जाते व येथून हे अन्न जिल्हाभरातील कामगारांना दुपारच्या वेळी वितरीत केले जाते.

दरम्यान, आमदार बांगर यांना या जेवणाविषयी तक्रार आली होती. त्यामुळे आज आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे. बुरशीजन्य डाळी, भाज्या, करपलेल्या चपात्या व अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्याने बांगर चांगलेच संतप्त झाले.

संतप्त झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला. पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT