santosh danve
santosh danve esakal
महाराष्ट्र

दानवेच्या मुलाची भविष्यवाणी ठरली खरी? शिंदेंसह सत्तारदेखील नाराज

धनश्री ओतारी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (MLC election) निकालानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. शिंदे यांच्यासोबत नॉट रिचेबलच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्यादेखील नावाचा समावेश आहे. दरम्यान, रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे यांनी आठवड्याभरापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आठवड्याभरापूर्वी, संतोष दानवे आणि सत्तार यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला होता. राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. या घडामोडीनंतर सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे माझ्यासोबत असणार असल्याचा दावा केला.

त्यांच्या याच टीकेला संतोष दानवे यांनी सुद्धा उत्तर देत चांगलाच समाचार घेतला होता. अब्दुल सत्तार हे कोणत्याच पक्षाचे नसून ते ज्या पक्षात राहतात त्यांचे सुद्धा ते कधीच नसतात असं सांगत अब्दुल सत्तार हे सेनेत असूनही सेनेचे नाहीत. असा दावा संतोष दानवे यांनी केला होता.

विधान परिषद निवडणुकीनंतर सत्तार नॉट रिचेबल येत आहेत. त्यामुळे संतोष दानवे यांची भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेसह 35 आमदार असल्याची चर्चा आहे. आमदारांच्या गटासह शिंदे सूरतमध्ये मुक्कामाला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT