Udayanraje Bhosale vs Shivendrasinharaje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

'लोकसभेत तुमचा का पराभव झाला अन् मी का निवडून आलो'

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही राजेंमध्ये चांगलीच जुंपलीय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

सातारा : साताऱ्यात दोन्ही राजेंमध्ये चांगलीच जुंपलीय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) माझ्याबद्दल मी छत्रपतींचा (Chhatrapati Shivaji Maharaj) विचाराचा आहे का, हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलाय. उदयनराजे थोर विचारवंत आहेत, इतिहासकार आहेत का? उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराने चालणारे आहेत तर लोकसभेला (Loksabha Election) तुमचा पराभव का झाला आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) मी निवडून का आलो याचं उत्तर उदयनराजेंनी द्यावं, असं थेट आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale) यांनी उदयनराजेंना दिलंय.

सध्या खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक युध्द पहायला मिळत आहे. विविध कारणावरुन दोन्ही राजे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. खासदार उदयनराजेंनी जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) एका कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजेंचं नाव न घेता त्यांच्यावर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबत गंभीर आरोप करताना आणि छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना छ. शिवाजी महाराजांचं आचार-विचार आचरणात आणून जोपासलं पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती आणि शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला होता.

उदयनराजेंच्या याच विधानाला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते उदयनराजेंना उद्देशून म्हणाले, रात्री-अपरात्री उशिरा गाड्या फिरवायच्या. गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून गावातून फिरायचं, हे उदयनराजेंच्या दृष्टीनं छत्रपतींचे विचार आहेत का? आपण जसं यात्रेमध्ये डोंबाऱ्याचा खेळ बघतो, तसा उदयनराजे यांच्या वाढदिवसाला (Udayanraje Birthday) देखील एक डोंबाऱ्याचा खेळ आपण बघितलाय, असा घणाघातही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचं नाव न घेता केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Accident: रुळावर होणारे अपघात टळणार, रेल्वेचा मोठा निर्णय, ११९ कोटींचा प्रकल्प हाती; वाचा सविस्तर

Harshvardhan Sapkal Statement : "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

T20 World Cup Super 8s Scenario : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचे स्थान पक्के; उर्वरित ६ जागांसाठी भारत-पाकिस्तानसह कोणात शर्यत?

JioHotstar Subscription Free : फ्रीमध्ये बघा भारत-पाकिस्तान T20 World Cup मॅच, 'या' आहेत 3 सोप्या ट्रिक..

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने वॉरंटच्या आधारे १२ ठिकाणी छापे

SCROLL FOR NEXT