Shivendrasinharaje Bhosle Chhatrapati Sambhajiraje esakal
महाराष्ट्र बातम्या

छत्रपती संभाजीराजेंचा 'यांनी' ठरवून गेम केला; भाजप आमदाराचा नेमका निशाणा कोणावर?

सकाळ डिजिटल टीम

'मराठा समाजातील कोणी माणूस पुढं जात असेल, तर आपण त्यांचे पाय ओढत असतो.'

सातारा : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) माध्यमातून छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांच्यामागं मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागं आहेत. मात्र, राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देताना संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहितीय. सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केलाय, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी केलीय. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बोंडारवाडी धरणाबाबत (Bondarwadi Dam) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजानं (Maratha Community) संभाजीराजेंच्या पाठीशी खंबीर उभं राहावं आणि छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व करावं. छत्रपती संभाजीराजे हे आमच्या छत्रपती कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे. मात्र, संभाजीराजेंचं मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण यामध्ये फार मोठं काम आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केलंय. यावेळी त्यांची खासदारकी गेली असेल, पण योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा ते पारखून निर्णय त्यांनी घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.

संभाजीराजेंनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश इथं त्यांनी मराठा समाजात जागृती केली. समाजाला एकत्र ठेवण्याचं काम केलं. संभाजीराजांच्या पुढील कारकिर्दीत मराठा समाजानं त्यांच्यासोबत रहावं. समाजासाठी स्थापन केलेल्या सकल मराठा संस्थेनंही त्यांच्या पाठीशी राहावं. कारण, त्यांचं समाजासाठी फार मोठं योगदान आहे. मराठा समाजातील कोणी माणूस पुढं जात असेल, तर आपण त्यांचे पाय ओढत असतो. त्यामुळं अशी भूमिका न घेता संभाजीराजेंना भविष्यात कशी मदत होईल, याचा विचार करावा, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Diwali Pet Care: फटाक्यांच्या आवाजाने कुत्रे-मांजर घाबरतात? अशी घ्या काळजी; पशुवैद्यांनी सांगितल्या ५ टिप्स

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

SCROLL FOR NEXT