mlc election 2022 sadabhau khot bmc election bhai jagtap vs prasad lad politics
mlc election 2022 sadabhau khot bmc election bhai jagtap vs prasad lad politics  
महाराष्ट्र

सदाभाऊंची माघार; प्रसाद लाड अन् भाई जगताप यांच्यात थेट होणार लढत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, या निवडणुकींचा गुलाल उधळल्यानंतर आता येत्या २० जुलै रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत, आणि त्यासाठी राज्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या निवडणूकीत गुप्त पध्दतीने मतदान असल्याने ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. (mlc election 2022 sadabhau khot bmc election bhai jagtap vs prasad lad politics)

दरम्यान राज्यातील विधानपरिषदेच्या या निवडणूकीसाठी ११ उमेदवार रिंगणात असणार आहेत, भाजप या निवडणूकीत पाच जागा लढवणार आहे, यामध्ये भाजप प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि प्रसाद लाड या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. तर शिवसेना सचिन अहिर, आमश्या पाडवी यांना संधी देत आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे निवडणूक रिंगणात असणार आहेत.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेस त्यांचा एक उमेदवार मागे घेईल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे पाचव्या जागेसाठी पुन्हा लढत होणार आहे. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष उमेदवारी (भाजपप्रणित) उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेण्यात आल्याने आता भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

जगताप-लाड यांच्यात थेट सामना

दरम्यान हे दोघे देखील कोकणातील नेते आहेत. तसेत मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे त्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर या लढतीला विशेष महत्व येणार आहे. हे दोघे बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत राजकारण करणारे नेते एकमेकांसमोर येणार आहेत. भाई जगताप आणि प्रसाद लाड या दोघांची मुंबईतील राजकीय वर्तुळात मजबूत पकड आहे, तसेच दोघांचे कॉर्पोरेट लॉबी सोबत चांगले संबंध असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

कुणाकडे किती मतं?

या निवडणूकीत मतांचा कोटा पाहाता महाविकास आघाडीकडे एकूण १६९ पक्षनिहाय कॉंग्रेस पक्षाकडे ४४ मते आहेत आणि त्यांच्याकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत विजयासाठी २७ मते आवश्यक असल्याने त्यांना १० मते कमी पडणार आहे. राष्ट्रवादी पक्षाकडे ५४ मते तर उरलेली शिवसेनेकडे उरलेली मते आहेत. तसेच निवडणूकीत भाजपने पाच उमेदवार दिले आहेत आणि भाजपकडे ११३ मते आहेत, त्यामुळे त्यांना देखील काही अपक्ष उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT