Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : पहिल्याच अधिवेशनात सत्यजीत तांबे मांडणार 'हे' मुद्दे; म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. येत्या २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून काल शिवसेनेच्या सर्व आमदारांना प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्यानेच निवडून आलेले सत्यजीत तांबे हे पहिल्या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अधिवेशनामध्ये उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांविषयी भाष्य केलं.

सत्यजीत तांबे म्हणाले की, अधिवेशनामध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे. हे पहिलं अधिवेशन असल्याने शाळेतला पहिला दिवस जसा असतो तशा भावना निर्माण झाल्या आहेत.

तांबे पुढे म्हणाले की, मी युवकांचा आवाज बनून सभागृहात काम करणार असून त्याबाबत माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.

भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा

शेड्यूल १० या पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याचं सरकारला भान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचं काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's squad for the Asian Games 2026 : वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गेली, आता आशियाई सुवर्णपदकासाठी तयारी; भारतीय संघाची घोषणा

भारतात 40 हजार कमावणारे स्वित्झर्लंडमध्ये 7 लाख पगार घेणाऱ्यांपेक्षा जास्त बचत करतात? व्हायरल व्हिडिओतून समोर आलं धक्कादायक वास्तव

Konkan Rock Art : हजारो वर्षांपूर्वी कोकणात मानवी जीवन कसं होतं? सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात झाला रत्नागिरीतील 'कातळशिल्पांचा' समावेश, पुस्तकात आणखी काय?

Netherlands vs Morocco Live: भगवं वादळ रोखलं! मोरोक्कोने शूट आऊटमध्ये नेदरलँड्सला नमवलं; श्वास रोखून धरायला लावणारी ५ मिनिटं

'आईचा संघर्ष दाखवायचा असेल तर सत्य दाखवा'; 'ईठा'वर विठाबाईंच्या मुलाची नाराजी

SCROLL FOR NEXT