महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe:ऑनलाईन तिकीट बुक करुन गळक्या बसमध्ये बसायचं का? आमदार सत्यजीत तांबेंचा एसटीला संतप्त सवाल

काही दिवसांपूर्वी दापोलीतील एका गळक्या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हा व्हिडीओ तांबेंनी आपल्या ट्वीटमध्ये जोडला.

Manoj Bhalerao

Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना नेहमी पुढे असतात. ते कोणत्याही मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत आणि भूमिका मांडतात. नुकताचं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि भारतीय रेल्वेमध्ये सामंजस्य करार झाला. त्यामुळे एसटीचं आरक्षण आता IRCTCच्या संकेतस्थळावरुन करता येणार आहे.

मात्र, सत्यजीत तांबे यांनी एसटीच्या सद्यस्थितीवरुन सरकारचे कान टोचले आहेत. एसटीची भयावह परिस्थिती दर्शवताना त्यांनी एक ट्वीट केलं. काही दिवसांपूर्वी दापोलीतील एका गळक्या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हा व्हिडीओ तांबेंनी आपल्या ट्वीटमध्ये जोडला.

नुकतेच एसटीच्या बसेसची दुरावस्था दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरलं झाले आहेत. गडचिरोलीत एका एसटी ड्रायव्हरने पाऊस सुरु असताना छत्री उघडून बस चालवली होती, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असताना बसमध्ये पाणी गळत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आले. (Latest Marathi News)

एका व्हिडीओमध्ये पाऊस सुरु असताना बसते वायपर्स निकामी झाले, त्यामुळे चालकाला हाताने हे वायपर्स फिरवावे लागले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी एसटीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले होते.

एसटी महामंडळाची ही वास्तविकता सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून समोर आणली. आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे तिकीट बुक करून एसटी महामंडळाच्या गळक्या बसमध्ये बसायचे का, असा प्रश्न विचारत दापोली येथील एका गळक्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. त्याच वेळी त्यांनी एसटी महामंडळाचा विकास कुठे चालला आहे, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला.

एसटी ही ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी आहे. अजूनही एसटीला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. पण महामंडळाकडून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बसगाड्या सेवेत असल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे फक्त दिखाऊ गोष्टींमध्ये तंत्रज्ञान आणि सुधारणा करण्यापेक्षा महामंडळाने एसटी गाड्यांची स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे आणि सरकारनेही एसटी महामंडळ टिकवण्यासाठी योग्य ती मदत करायला हवी, असं मत आमदार तांबे यांनी व्यक्त केलं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT